राजकीय
संविधानिक पद नसताना समरजीतराजेंचे कार्य घराघरात पोहोचले.* *अखिलेशराजे घाटगे
By nisha patil - 10/31/2024 7:32:51 PM
Share This News:
*संविधानिक पद नसताना समरजीतराजेंचे कार्य घराघरात पोहोचले.*
*अखिलेशराजे घाटगे*
कागल गडहिंग्लज उत्तुरच्या
शाश्वत विकासासाठी समरजिसिंह घाटगे यांना साथ द्या.
: महाविकास आघाडीचे उमेदवार समरजीतसिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ साकेत बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद
म्हाकवे,ता.३१:समरजीत सिंह राजे यांच्याकडे कोणतीही संविधानिक पद नाही तरीही, शिक्षण , आरोग्य, शासकीय योजना त्याच्या माध्यमातून त्यांचे कार्य घरोघरी पोहोचले आहे.असे प्रतिपादन अखिलेशराजे घाटगे यांनी केले.साके तालुका कागल येथे आयोजित परिवर्तन बैठकीत ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी पांडुरंग पाटील होते.
ते पुढे म्हणाले, विधानसभेच्या कागल गडहिंग्लज उत्तुर मतदारसंघाच्या शाश्वत विकासासाठी समरजिसिंह घाटगे यांच्यासारख्या उच्चशिक्षित नेतृत्वाची आजकाल तर त्याला गरज आहे त्यांच्याच्याकडे कोणतेही संविधानिक पद नाही. तरी ही त्यांनी कोट्यावधी रुपयांचा विकासकामांसाठी निधी खेचून आणला. हा निधी वाटप करताना प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा या ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्राधान्य दिले. त्याचबरोबर प्राथमिक शाळांमध्ये ई लर्निंगची सुविधा उपलब्ध करून दिली.
समरजितसिंह घाटगे विविध सामाजिक कार्यातून प्रत्येकाच्या घराघरात आणि मनामनात पोहोचले आहेत. त्यांना या निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी करा.
स्वागत व प्रास्ताविक अनिल पाटील यांनी केले यावेळी डी एस कांबळे पांडुरंग पाटील मच्छिंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले बैठकीस शहाजी पाटील,वसंत तुरंबे, शामराव शेंडे, विश्वास पाटील, सुभाष पाटील, प्रकाश सातुशे, शरद पाटील, शहाजी शेंडे, रंगराव सुतार, अनिल कांबळे, तुकाराम पाटील, रावसाहेब चौगुले, सुनील घराळ, अशोक कांबळे आदी उपस्थित होते सुभाष शेंडे यांनी आभार मानले.
--
*जनतेने ठरवलंय सुरत लुटायची..*
कागल गडहिंग्लज उत्तुर मधील स्वाभिमानी मतदार हे शिवरायांचे मावळे आहेत. पंचवीस वर्षाच्या भ्रष्टाचारातून पालकमंत्र्यांनी कोट्यावधी रुपयांची कमाई केली आहे. जनतेतून झालेला उठावामुळे पालकमंत्री घाबरल्याने गावागावात जेवणाची पास, भेटवस्तू, तसेच लक्ष्मीचे दर्शनही देत आहेत. तुम्ही कितीही आमिषे दाखवली तरी येथील जनतेने तुमची सुरत लुटायची आणि तुमची जागा तुम्हाला दाखवून द्यायची हे
पक्के ठरवले असून मतदान मात्र समरजीतसिंह घाटगेंना करण्याचा निर्धार स्वाभिमानी जनतेने केला आहे. असे प्रतिपादन मच्छिंद्र पाटील यांनी केले.
--
संविधानिक पद नसताना समरजीतराजेंचे कार्य घराघरात पोहोचले.* *अखिलेशराजे घाटगे
|