बातम्या
हसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आ. अमल महाडिकांची बैठक
By nisha patil - 1/31/2025 7:50:02 PM
Share This News:
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील रत्नाप्पाण्णा कुंभार हाउसिंग सोसायटी तथा आर के नगर ही सर्वात जुनी आणि मोठी गृहनिर्माण संस्था आहे. या संस्थेच्या मालमत्ता धारकांना प्रॉपर्टी कार्ड आणि सातबारा नोंदणी संदर्भात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
त्या अनुषंगाने भूमी अभिलेख आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत व नागरिका समवेत आर के नगर येथे आ. अमल महाडिकांनी बैठक घेतली. लवकरात लवकर सर्व मिळकत धारकांना प्रॉपर्टी कार्ड वितरित करण्यासंदर्भात आ.अमल महाडिकांनी या बैठकीत विस्तृत चर्चा केली.आ. अमल महाडिक म्हणाले, प्रथमच अधिकारी आणि नागरिकांची थेट चर्चा झाल्यामुळे समस्या निकालात निघतील याची खात्री आहे.
हसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आ. अमल महाडिकांची बैठक
|