बातम्या

गोकुळ शिरगाव येथे सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मिडियम हायस्कूल, "बाल दिन" उत्साहात साजरा

Ambubai Patil English Medium High School


By nisha patil - 11/14/2024 10:04:32 PM
Share This News:



गोकुळ शिरगाव येथे  सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मिडियम हायस्कूल, "बाल दिन" उत्साहात साजरा 

गुरुवार, १४ ऑक्टोबर २०२४ रोजी सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मिडियम हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, गोकुळ शिरगाव येथे "बाल दिन" हा कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि आनंददायक वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात चाचा नेहरू यांना वंदन करून करण्यात आली.

सौ. मीरा राऊत ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. सौ. विद्या आवटे मॅडम यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. शाळेचे संस्थापक माननीय श्री. के.डी. पाटील सर, प्रिन्सिपल तेजस पाटील सर, व्हॉईस प्रिन्सिपल सौ. निर्मला केसरकर मॅडम, मुख्याध्यापिका सौ. एस.के. पाटील मॅडम, सौ. मेघा पाटील मॅडम, सौ. झेबा मुजावर मॅडम, तसेच शाळेचे सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

बाल दिनाच्या निमित्ताने शाळेमध्ये 'वेशभूषा स्पर्धे'चे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या सांस्कृतिक वेशभूषा परिधान करून कार्यक्रमाचा उत्साह वाढवला. सौ. गीता पाटील व सौ. नीलम जाधव मॅडम यांनी सूत्रसंचालन केले आणि विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला रंगत आली.

या खास दिवशी विद्यार्थ्यांनी आपल्या संस्कृतीला जोपासत विविध वेशभूषा करून 'बाल दिन' साजरा केला, ज्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन आनंद अनुभवला.


गोकुळ शिरगाव येथे सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मिडियम हायस्कूल, "बाल दिन" उत्साहात साजरा
Total Views: 36