शैक्षणिक
सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा
By nisha patil - 2/27/2025 8:03:38 PM
Share This News:
सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा
गोकुळ शिरगाव – सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मिडियम हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे ॲड. अनिल पाटील यांच्या हस्ते वी. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाषणे, वेशभूषा, नृत्य, एकपात्री नाटक, नवरस सादरीकरण यांसारखे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. प्रमुख पाहुण्या सौ. एस. के. पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. नीलम जाधव मॅडम यांनी केले, तर सौ. सीमा पाटील मॅडम यांनी आभार मानले.
सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा
|