शैक्षणिक
अंबूबाई पाटील स्कूलमध्ये शिवरायांना मानवंदना;
By nisha patil - 2/20/2025 12:21:30 PM
Share This News:
अंबूबाई पाटील स्कूलमध्ये शिवरायांना मानवंदना;
शिवजयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी
गोकुळ शिरगाव येथील अंबूबाई पाटील स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेच्या आवारात असलेल्या शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत संस्थेचे अध्यक्ष के. डी. पाटील सर यांनी अभिवादन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांना मानवंदना देत त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला.
कार्यक्रमात शाळेतील शिक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा करून अभिवादन केले. या सोहळ्याला अध्यक्ष के. डी. पाटील सर, तेजस पाटील सर, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवरायांच्या जीवनचरित्रावर आधारित प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या बद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या..
अंबूबाई पाटील स्कूलमध्ये शिवरायांना मानवंदना;
|