बातम्या
लाल परी झाली रुग्णवाहिका...
By nisha patil - 8/24/2024 2:56:42 PM
Share This News:
वेळ सायंकाळी ४;३० ची, कोल्हापूरहून तासगावकडे जाणारी बस फलक क्रमांक ३ वर लागली आणि सर्व प्रवाश्यांची गाडीत चढण्याची लगबग सुरु झाली.
तशी फारशी गाडीला गर्दी नव्हती, प्रवासी भरभर चालून गाडीत बसले आणि गाडी परतिच्या प्रवासाला लागली. चालक प्रत्येक प्रवाशाचे तिकीट काडू लागले. बसने तावडे हॉटेल सोडून शिये फाट्याकडे धाव घेतली,आणि आचानक साधारण २४,२५ वय असणाऱ्या अभिजित मोहिते या तरुणाच्या छातीत आचानक दुखू लागलं. त्याला काहीच सुचेनासं झालं. तो तरुण मागच्या सीटवर गेला आणि त्याने एका प्रवासी मुलीला छातीत दुखत असल्याचे सांगितले. त्या प्रवासी मुलीने बस मधून प्रवास करत असलेल्या एका परिचारिकेस हा प्रकार सांगितला आणि त्याच्यावर प्राथमिक उपचार सुरु झाले. सर्व प्रवासी भांबावले.
बस वाहकाने सर्व प्रकार पाहून रुग्णवाहिकेला फोन केला पण पेठ वडगाव आणि कोल्हापूरच्या मध्यावर बस असल्याने बस मधूनच रुग्णास हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्याचे ठरले. प्रवासी मुलीने तरुणाच्या घरी फोन करून कुटुंबियांना पेठ वडगाव मधील अशोक पाटील हॉस्पिटलमध्ये येण्यास सांगितले. चालकाने वन वे चा विचार न करता गाडी सरळ अशोक पाटील हॉस्पिटल मध्ये घेतली. व एका आदर्श चालक आणि वाचकाचे उदाहरण सामाज्यापुढे ठेवले.
यावरून एक गोष्ट लक्ष्यात येते कि माणसाच्या आयुष्यात कधीही कोणतीही घटना शकते. अशा वेळी बसमध्ये आचानक घडणाऱ्या घटनांसाठी प्राथमिक सुविधा असणे फार गरजेचे आहे.
लाल परी झाली रुग्णवाहिका...
|