मनोरंजन
अमिताभ बच्चन यांच्या पोस्टने चाहत्यांमध्ये चिंता
By nisha patil - 8/2/2025 8:04:10 PM
Share This News:
अमिताभ बच्चन यांच्या पोस्टने चाहत्यांमध्ये चिंता
"जाण्याची वेळ झाली आहे" – बिग बींच्या पोस्टने सोशल मीडियावर चर्चा
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सक्रिय असून, त्यांच्या पोस्ट नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. मात्र, शुक्रवारी (७ फेब्रुवारी) रात्री ८.३४ वाजता त्यांनी "जाण्याची वेळ झाली आहे" अशी पोस्ट एक्स (माजी ट्विटर) वर केल्याने चाहत्यांमध्ये चिंता पसरली.
या पोस्टमुळे अनेकांनी त्यांच्या प्रकृतीविषयी विचारणा केली. काही चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या, तर काहींनी "बिग बी, सर्व ठीक आहे ना?" असे विचारले. मात्र, ही पोस्ट नेमकी कशासाठी होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अमिताभ बच्चन यांच्या पोस्टने चाहत्यांमध्ये चिंता
|