विशेष बातम्या

आणि त्यांच्या कार्यतत्परतेमुळे मिळाला नागरिकांना मोठा दिलासा..

And due to their willingness to work


By nisha patil - 3/3/2025 3:00:22 PM
Share This News:



आणि त्यांच्या कार्यतत्परतेमुळे मिळाला नागरिकांना मोठा दिलासा..

झाकीर जमादार यांनी  चेंबर शोधून केली साफसफाई;

प्रभाग क्रमांक 12 मधील इंडस्ट्रिअल इस्टेट परिसरातील प्रबोधिनी वाचनालय समोरील रस्त्यावर मेन ड्रेनेज लाईनमध्ये मोठा चॉकअप होऊन परिसरातील नागरिकांचे हाल सुरू होते. घरगुती शौचालये देखील बंद पडल्याने अस्वस्थता निर्माण झाली होती. या त्रासाची माहिती मिळताच परिसराचे सक्रिय नेतृत्व करणारे रियाजअहमद उर्फ झाकीर जमादार यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली.

नवीन रस्त्यामुळे चेंबर झाकले गेले होते, त्यामुळे समस्या अधिक बिकट होती. मात्र, झाकीर जमादार यांनी यावर योग्य उपाययोजना करत महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेऊन विशेष मशीनची मागणी केली. स्वतः मैदानात उतरून चेंबर शोधून काढले आणि जेटिंग मशीनच्या साहाय्याने संपूर्ण ड्रेनेज लाईन साफ करून प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढला.

या संपूर्ण प्रक्रियेत झाकीर जमादार स्वतः उपस्थित राहून मार्गदर्शन करत राहिले, त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी त्यांच्या या तत्परतेचे आणि कामातील झोकून देण्याच्या वृत्तीचे मनःपूर्वक कौतुक केले आहे.

लोकांच्या अडचणींमध्ये नेहमीच धाव घेणारे झाकीर जमादार हे खरेखुरे जनतेचे प्रतिनिधी असल्याची भावना आता प्रबळ होत आहे!


आणि त्यांच्या कार्यतत्परतेमुळे मिळाला नागरिकांना मोठा दिलासा..
Total Views: 28