बातम्या
आणि सोन्याच्या गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान
By nisha patil - 7/25/2024 7:24:55 PM
Share This News:
मंगळवारी निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. यामध्ये त्यांनी सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरील कस्टम ड्युटी कमी करण्याचाी घोषणा केली आहे. त्यामुळं सोन्याच्या गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे सोन्याचे दर कमी झाल्यामुळं खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे.
अर्थसंकल्पाने सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठा बदल घडवून आणला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ज्वेलर्सच्या जुन्या मागणीनंतर सोने आणि इतर काही मौल्यवान धातूंवरील कस्टम ड्युटी कमी करण्याचा प्रस्ताव दिला. या निर्णयाचा जनतेवर दुहेरी परिणाम होत आहे. एकीकडे असे लोक आहेत जे सोने खरेदीच्या तयारीत होते, त्यांना मोठा फायदा झाला आहे. मात्र, दुसरीकडे असे लोक आहेत ज्यांनी आधीच सोन्यात गुंतवणूक केली होती, त्यांचे नुकसान झाले आहे.
आणि सोन्याच्या गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान
|