बातम्या

आणि आईनेचं आवळला मुलाचा गळा...

And the child's throat was cut off by the mother


By nisha patil - 10/1/2025 2:49:01 PM
Share This News:



आणि आईनेचं आवळला मुलाचा गळा...

स्क्रिझोफेनिया ग्रस्त आईने मुलाचा घेतला जीव

 वांद्रे पूर्वेतील खेरवाडी परिसरातील वाय कॉलनीत राहणाऱ्या औटी कुटुंबावर दुर्दैवी घटना घडली आहे. सर्वेश या आपल्या दहा वर्षाच्या मुलाचा  स्क्रीझोफेनिया ग्रस्त आईने गळा वायरीने आवळून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. 

अभिलाषा औटी मुंबईतील वांद्रे पूर्व येथील खेरवाडी परिसरातील वाय कॉलनीत राहतात. त्या स्क्रिझोफेनिया या मानसिक आजाराने ग्रस्त असल्याने त्यांची मानसिक स्थिती बिघडलेली होती. गुरुवारी संध्याकाळी, काही कारणास्तव रागाच्या भरात त्यांनी आपल्या मुलाला, सर्वेशला, बेडरुममध्ये खेचून नेले आणि एका वायरने त्याचा गळा आवळून हत्या केली.या घटनेत सर्वेशचा जागीच मृत्यू झाला. सर्वेशचे वडील, उप-सचिव पदावर कार्यरत, यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर अभिलाषा औटी यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे खेरवाडी परिसरातील नागरिक शोकाकुल झाले असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.


आणि आईनेचं आवळला मुलाचा गळा...
Total Views: 48