विशेष बातम्या
राहुल गांधींच्या 'श्रद्धांजली' ट्विटवर संताप
By nisha patil - 2/19/2025 7:19:18 PM
Share This News:
राहुल गांधींच्या 'श्रद्धांजली' ट्विटवर संताप
संभाजीराजेंचा सवाल – "जयंतीला श्रद्धांजली कशी?"
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला "श्रद्धांजली" अर्पण करणाऱ्या राहुल गांधी यांच्या ट्विटवर राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
छत्रपती संभाजीराजे यांनी यावर नाराजी व्यक्त करत विचारले – "जयंतीच्या दिवशी कोणी श्रद्धांजली अर्पण करते का?"
शिवभक्तांनी राहुल गांधींनी भाषेची योग्य जाण ठेवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. राज्यभर संतापाची लाट उसळली असून, राहुल गांधी यावर स्पष्टीकरण देतात का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
राहुल गांधींच्या 'श्रद्धांजली' ट्विटवर संताप
|