बातम्या
संतप्त तरुणीची मोदींना जीवे मारण्याची धमकी!
By nisha patil - 12/3/2025 6:05:38 PM
Share This News:
संतप्त तरुणीची मोदींना जीवे मारण्याची धमकी!
एके-47 हातात घेऊन तरुणीचा व्हिडिओ व्हायरल
पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ती तरुणी एके-47 हातात घेऊन मोदींविरोधात द्वेषपूर्ण भाषा वापरताना दिसत आहे.
या व्हिडिओवर नेटकरी संतप्त प्रतिक्रिया देत असून, संबंधित मुलीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. अद्याप व्हिडिओचे लोकेशन आणि तारखेची माहिती समोर आलेली नसली तरी कट्टरतावादाच्या वाढत्या प्रवृत्तीमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
संतप्त तरुणीची मोदींना जीवे मारण्याची धमकी!
|