बातम्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती कोल्हापूरच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Annbhau sathe


By nisha patil - 1/8/2024 4:57:49 PM
Share This News:



*सध्याच्या वास्तव भयावह परिस्थितीत अण्णाभाऊंची क्रांतिकारी लेखणी जागृत होणं काळाची गरज - प्रेमानंद मौर्य*


*डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती कोल्हापूरच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी*

,"जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मज भीमराव" असं सांगून आपली क्रांतिकारी लेखणी आणि शाहीरीतून सबंध महाराष्ट्रभर सामाजिक विचारांचा आवाज पोहोचवणारे जगद्विख्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती कोल्हापूर जिल्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती वतीने कोल्हापूर येथील ऐतिहासिक मिस क्लार्क बोर्डिंग येथे साजरी करण्यात आली.

यावेळी जयंती समितीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस प्रेमानंद मौर्य ,मार्गदर्शक डी.जी भास्कर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंदराव जाधव तसेच कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष आर.एस. दीक्षांत यांच्या मंगल हस्ते अण्णाभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.

जयंतीच्या निमित्ताने मिस क्लार्क बोर्डिंग येथील सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या निवासस्थानी आवश्यक असणाऱ्या गाद्यांचे  वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना मा.प्रेमानंद मौर्य म्हणाले, सामाजिक परिस्थितीत अण्णाभाऊंनी त्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेऊन लेखणीच्या आणि शाहिरीच्या माध्यमातून लढा दिला आणि परिवर्तनाचा जागर केला.

असाच लढा आजच्या या भयावह काळात उभा राहणे आणि लेखणी जागृत होणे काळाची गरज आहे. तरच इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला आपण तडीपार करू शकतो आणि हीच अण्णाभाऊंना खरी मानवंदना ठरेल. फुले आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ मार्गदर्शक  मा.डी.जी. भास्कर यांनी अण्णाभाऊंचा विचार हा सर्वांच्या पर्यंत पोहोचला पाहिजे कारण तो विचार  क्रांतिकारी  आहे असं मत व्यक्त केले. या उपक्रमास संंघटनेचे सभासद विजय ठाणेकर यांनी रु.५०००/- एवढी देणगी दिली.तसेच मिस क्लार्क बोर्डिंगच्या वतीने सर्व मान्यवरांचे सन्मानचिन्ह देऊन अभिनंदन करण्यात आले.

याबद्दल कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा.आनंदराव जाधव, मिस क्लार्क बोर्डिंगचे  उपाध्यक्ष मा.के.डी कांबळे, सचिव मा.दीपक कांबळे, तसेच महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे परिमंडळ सचिव इंद्रजीत कांबळे, विजय ठाणेकर, स्वाती काळे ,सुनील म्हेत्रे ,सुनील शिवशरण , रोहित विणकरे, सुधाकर विणकरे, यांच्यासह समितीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे सचिव वैभव प्रधान यांनी केले तर आभार समितीचे सहकोषाध्यक्ष सुकुमार कोठावळे यांनी मानले.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती कोल्हापूरच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी