बातम्या

स्वातंत्र्यदिनी आप तर्फे प्राणीमित्रांचा सत्कार

Annimal friend award


By nisha patil - 8/15/2024 9:24:30 PM
Share This News:



देशाच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने उद्यमनगर येथील कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.


कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, आर्किटेक्ट व इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला. यावेळी आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई, परिखपूल रेनोवेशनचे फिरोज शेख, सचिन घाटगे, राधेश्याम रेंगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी जिल्हातील छत्रपती वाईल्ड लाईफ  फाउंडेशन आणि सह्याद्री शिलेदार सेवा ट्रस्टच्या सर्प आणि प्राणी मित्रांचा सत्कार पार पडला. यामध्ये सत्कारमूर्ती देवेंद्र भोसले, आशुतोष सूर्यवंशी, अभिजीत सूर्यवंशी, विनायक आळवेकर, ओंकार काटकर, प्रतीक रयत, स्नेहा जाधव, अश्विनी जाधव, चेतन बिरांजे, तेजस जाधव, आकाश कार्वेकर, राकेश शिखरे, प्रदीप सुतार, अमोल चव्हाण, किरण चौगुले, अजिंक्य बच्चे, किरण कुंभार तसेच कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


स्वातंत्र्यदिनी आप तर्फे प्राणीमित्रांचा सत्कार