बातम्या

महायुतीला आणखी एक धक्का ; के पी पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार

Another blow to the Grand Alliance


By nisha patil - 8/26/2024 3:27:04 PM
Share This News:



गेल्या काही दिवसात आजरा भुदरगड राधानगरी या तालुक्यात महाविकास आघाडी कडून नेमके कोण याची जोरदार चर्चा होती मात्र याला आता पूर्णविराम मिळणार असून बिद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष के पी पाटील हे लवकरच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलत जात आहे. महायुतीकडून प्रकाश आबिटकर व महाविकास आघाडीकडून केपी पाटील अशी दुरंगी लढत सध्या दिसणार असल्याची चर्चा सध्या इथं  रंगली आहे. उद्धव ठाकरे गटाकडून के पी पाटील यांना आमंत्रण मिळाले असून के पी पाटील यांच्याकडूनही या गोष्टीला दुजोरा मिळाला आहे. त्यामुळे के पी पाटील यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे महायुतीला हा आणखी एक धक्का मानला जात आहे


महायुतीला आणखी एक धक्का ; के पी पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार