बातम्या

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ अंतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Appeal to take advantage of various schemes


By nisha patil - 3/2/2025 8:52:02 PM
Share This News:



वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ अंतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

कोल्हापूर,  – वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ अंतर्गत पैलवान कै. मारुती चव्हाण - वडार आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) आणि राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) तसेच वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मुख्य कंपनी) कोल्हापूर कार्यालयाद्वारे 1 लाख रुपये थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेत विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील लोकांना कर्ज उपलब्ध होणार असून, सन 2024-25 या आर्थिक वर्षाच्या उद्दिष्ट प्राप्तीच्या दृष्टीने कर्ज वितरण केले जाणार आहे. जिल्हा व्यवस्थापक किरण गिऱ्हे यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित समाजातील लोकांना आवाहन केले आहे.

योजनेअंतर्गत 2,085 रुपयांचे नियमित 48 समान मासिक हप्त्यांमध्ये कर्ज परतफेड केली जाईल. या कर्जावर व्याज अदा करणे आवश्यक नाही, परंतु थकीत हप्त्यावर 4% व्याजदर आकारला जाईल. (नियम व अटी लागू)

अधिक माहितीसाठी, कोल्हापूर येथील वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा: पत्ता: डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, 3 रा मजला, खो.क्र. 2 विचारे माळ (कावळा नाका) ताराराणी चौक, कोल्हापूर
दूरध्वनी क्र.: 0231-2662313


वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ अंतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
Total Views: 50