बातम्या

उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय, उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथ मित्र पुरस्कारासाठी अर्ज करा

Apply for Outstanding Public Library


By nisha patil - 8/26/2024 3:18:06 PM
Share This News:



 सन 2023-24 या वर्षीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार आणि डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 25 सप्टेंबर 2024 पर्यंत तीन प्रतीत आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे सादर करावेत,  असे आवाहन ग्रंथालय संचालनालयाचे  प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.

 शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयाकडून जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालय सेवा उपलब्ध करुन द्याव्यातवाचन संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने डॉबाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार तसेच ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉशियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने डॉएसआररंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र)  पुरस्कार देण्यात येतो.

 

राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील ” “” “” “” वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे 1 लाख रुपये, 75 हजार रुपये, 50 हजार रुपये, 25 हजार रुपयेसन्मानचिन्हप्रमाणपत्रग्रंथभेट आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात येते.

 राज्यातील एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी रुपये 50 हजार रुपये तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील प्रत्येकी एक उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी रुपये 25 हजार रुपये, सन्मानचिन्हप्रमाणपत्रग्रंथभेट आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात येते. जिल्ह्यातील पुरस्कारासाठी इच्छुक ग्रंथालयेकार्यकर्ते व सेवक यांनी  आपले अर्ज जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांनी केले आहे.


उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय, उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथ मित्र पुरस्कारासाठी अर्ज करा