शैक्षणिक
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात "अर्जुन इनोव्हेशन, इन्क्युबेशन फाऊंडेशन" ची स्थापना
By nisha patil - 11/2/2025 3:14:38 PM
Share This News:
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात "अर्जुन इनोव्हेशन, इन्क्युबेशन फाऊंडेशन" ची स्थापना
कोल्हापूर: डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात "डिवायपीसीईटी अर्जुन इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड एंटरप्रेन्योरशिप फाऊंडेशन" (DAIIEF) ची स्थापना करण्यात आली आहे. नवोदित उद्योजकांना तांत्रिक, व्यवस्थापन व वित्तीय मार्गदर्शन देण्याच्या उद्देशाने हे केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. अनिलकुमार गुप्ता (कार्यकारी संचालक, डी. वाय. पाटील ग्रुप) यांनी दिली.
DAIIEF मार्फत मिळणाऱ्या सुविधा:
स्टार्टअप्सना उद्योग तज्ज्ञांचे मार्गदर्शन
हार्डवेअर-सॉफ्टवेअर प्रोटोटायपिंग सुविधा
3D प्रिंटिंग आणि चाचणी प्रयोगशाळा
बीजभांडवल सहाय्य, अनुदाने व गुंतवणूक संधी
स्टार्टअप बूटकॅम्प, कार्यशाळा आणि नेटवर्किंग संधी
व्यवसाय मॉडेल विकास आणि कंपनी नोंदणी मार्गदर्शन
संस्थेचे मार्गदर्शक आणि योगदान:
या फाऊंडेशनच्या स्थापनेसाठी डॉ. सिद्धेश्वर पाटील (AI & ML विभाग प्रमुख) आणि डॉ. सुनील रायकर (मेकॅनिकल विभाग प्रमुख) यांनी विशेष परिश्रम घेतले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आ. ऋतुराज संजय पाटील, प्राचार्य डॉ. संतोष चेडे आणि रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
ही नवीन संधी स्टार्टअप्सना जागतिक स्तरावर यश मिळविण्यास मदत करेल.
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात "अर्जुन इनोव्हेशन, इन्क्युबेशन फाऊंडेशन" ची स्थापना
|