बातम्या

अरविंद केजरीवालांची जेलमधून सुटका

Arvind Kejriwal released frm jail


By nisha patil - 9/13/2024 7:46:49 PM
Share This News:



अरविंद केजरीवालांची जेलमधून सुटका

आप कडून साखर वाटून जल्लोष 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना कथित मद्य घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप करून सीबीआय ने अटक केली होती. गेले पाच महिने ते तिहार जेलमध्ये होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर एका विरोधी पक्षाच्या नेत्याला अटक झाल्याने देशभरातून यावर प्रतिक्रिया उमटत होत्या.

लोकसभा निवडणुकीवेळी सर्वोच्च न्यायालयाने केजरीवालांना अंतरीम जामीन मंजूर करून त्यांना दिलासा दिला होता. परंतु निवडणुकीनंतर त्यांना पुन्हा तुरुंगात जावे लागले होते.

कथित मद्य घोटाळ्यात त्यांना ईडी कडून जामीन मिळाला होता, दरम्यान त्यांना सीबीआय ने अटक केली होती. या प्रकरणात अटक केलेल्या चाळीस पैकी अडतीस आरोपीना जामीन दिला गेला होता. या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांना देखील जामीन दिला गेला. तसेच सीबीआयच्या कार्यप्रणालीवर कठोर निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायलयाने त्यांनी पिंजऱ्यात असलेला पोपट असल्यासारखे वागू नये असे सुनावले.

या निर्णयाचे स्वागत करत आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उद्यमनगर येथील कार्यालयासमोर साखर वाटप केले.

सर्वोच्च न्यायालयाने जामीन देऊन केजरीवालांना दिलासा दिला. लोकशाही धोक्यात येत असताना न्यायालयाचा निर्णय आमच्यासाठी स्वागतार्ह आहे, केजरीवालांना या खोट्या आरोपांमधून निर्दोष सुटतील असा विश्वास आप चे प्रदेश संघटन सचिव संदिप देसाई यांनी व्यक्त केला.

यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, मोईन मोकाशी, विजय हेगडे, डॉ. कुमाजी पाटील, रवींद्र राऊत, अमरसिंह दळवी, रमेश कोळी, संजय नलवडे, दिलीप पाटील आदी उपस्थित होते.


अरविंद केजरीवालांची जेलमधून सुटका