राजकीय

"प्रेमाने मागा, सगळं देऊन टाकू" - सुप्रिया सुळे यांचे कोल्हापुरात भावनिक वक्तव्य

Ask with love give everything


By nisha patil - 1/24/2025 6:09:25 PM
Share This News:



राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कोल्हापुरातील भाषणात सांगितले की, "प्रेमाने मागा, सगळं देऊन टाकू. खाली हात आलो, खाली हात जाऊ." त्या म्हणाल्या की, निवडणुका येतात-जातात, पण नाती कायम राहतात.

"मी कोणत्याही पदासाठी महत्वाकांक्षी नाही," असे स्पष्ट करत त्यांनी आपल्या निवडणुकीतील आव्हानांवर भाष्य केले. "सगळी यंत्रणा माझ्या विरोधात होती, पण जनतेच्या पाठिंब्याने मी निवडून आले."

शरद पवार यांचे कोल्हापुरावर असलेले प्रेम सांगताना त्या म्हणाल्या, "आमचे वडील कधी रिटायर्ड होतील हे कोणालाच माहीत नाही."

पक्षाच्या फुटीवर त्यांनी उपरोधिक टिप्पणी करत म्हटले, "तुमचा पक्ष नेते वेळ देत नाहीत म्हणून फुटला, आमचा नेते वेळ जास्त देतात म्हणून!"

सुले म्हणाल्या, "आता ऐकायला शिकले आहे, कारण ऐकण्यात खूप ताकद असते. यामुळेच मी लोकसभेत जिंकलो."


"प्रेमाने मागा, सगळं देऊन टाकू" - सुप्रिया सुळे यांचे कोल्हापुरात भावनिक वक्तव्य
Total Views: 51