बातम्या
राधिकाच्या ओढणीवर तब्बल एवढ्या किंमतीचा ......
By nisha patil - 11/7/2024 8:32:51 PM
Share This News:
सध्या एका रॉयल लग्नात सगळ्यांनाच पाहायला मिळत आहे. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची तयारीने जगभरातील लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दोन प्री वेडिंग, संगीत, हळद या सगळ्याच सोहळ्यांना राजकीय नेत्यांपासून ते बॉलीवूडच्या कलाकारापर्यंत हजेरी लावली जातेय.
नुकतच अनंत आणि राधिकचा हळदी सोहळा पार पडला. या लग्नसराईतली प्रत्येक गोष्ट बरीच चर्चेचा विषय ठरतेय. त्यातच राधिकाचे ड्रेस हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय ठरतोय. जवळपास कोट्यवधी रुपयांचे ड्रेस राधिका तिच्या लग्नाच्या समारंभासाठी घालतेय. पण सगळ्यात विशेष लक्ष वेधून घेतलं ते तिच्या हळदीच्या लूकने. अगदी सोज्वळ असं सोंदर्य साऱ्यांच्याच पसंतीस पडत आहे. या लूकसाठी तिने खास खऱ्या फुलांची निवड केली होती. त्यामुळे तिच्या या लूकच्या किंमतीची अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे. तिच्या या खास ओढणीसाठी जवळपास 1000 मोगऱ्याच्या कळींचा वापर केला आहे. त्याचप्रमाणे 90 च्या आसपास खऱ्या झेंडूची फुलं वापरण्यात आली आहे. तिच्या फुलांच्या दागिन्यासह या ओढणीची किंमत सर्वसाधारणपणे 27,000 हजारांच्या आसपास असू शकते. दरम्यान तिच्या फक्त ओढणीची किंमत ही 30,000 हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे सध्या राधिकाची ओढणी हा बराच चर्चेचा विषय ठरला आहे.
राधिकाच्या ओढणीवर तब्बल एवढ्या किंमतीचा ......
|