बातम्या
लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
By nisha patil - 2/26/2025 8:40:26 PM
Share This News:
लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
कोल्हापूर,– शाहूपुरी पोलीस ठाण्यात एका महिलेनं तक्रार दाखल करत एका तरुणाविरोधात बलात्कार, मारहाण आणि गर्भपात करण्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विश्वजीत सचिन जाधव (रा. आयडियल कॉलनी, फुलेवाडी, जाधव मळा, कोल्हापूर) याने 2018 पासून फिर्यादी महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी शारीरिक संबंध ठेवले. मात्र, कालांतराने त्याने पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. संबंधांचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केले. तसेच, बंदुकीचा धाक दाखवत मारहाण व शिवीगाळही केली.
याच दरम्यान, पीडित महिला गरोदर राहिली असता आरोपीने तिला जबरदस्तीने काही औषधे देऊन दोन वेळा गर्भपात घडवून आणल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.
महिलेच्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलिसांनी गु.र.नं. 143/2025 भा.दं.वि. कलम 69, 88, 115 (2), 352, 351(2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो.स.ई. बंबरगेकर आणि म.पो.स.ई. पालेकर करीत आहेत.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
|