बातम्या

अतुल बेनके अजित पवारांची साथ सोडणार......... ?

Atul Benke will leave the support of Ajit Pawar


By nisha patil - 7/20/2024 2:21:39 PM
Share This News:



  राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके  यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार  यांची भेट घेतली. त्यामुळे आता अतुल बेनके ही अजित पवारांची साथ सोडणार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. खासदार अमोल कोल्हे  यांच्या घरी अतुल बेनके आणि शरद पवार यांची भेट झाली. या भेटीवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी मोठं वक्तव्य केले आहे. 
     

अजित पवार म्हणाले की,माझी देखील अनेक आमदार भेट घेतात. बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली तर याबाबत त्यांनाच विचारा. निवडणुका आल्यावर काहींना निवडणूक लढायची असते. मात्र ही जागा आपल्या पक्षाला सुटणार नाही हे लक्षात आल्यावर आपण इथं थांबण्यापेक्षा दुसऱ्या पक्षात जाऊ, असे अनेकांना वाटतं. त्यामुळे लोक एकमेकांच्या भेटी घेतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे.


अतुल बेनके अजित पवारांची साथ सोडणार......... ?