बातम्या

डी वाय पाटील अभियांत्रीकीमध्ये "ऑटो रीवोल्युशन एक्स्पो" संपन्न

Auto Revolution Expo


By nisha patil - 2/13/2025 6:19:40 PM
Share This News:



डी वाय पाटील अभियांत्रीकीमध्ये "ऑटो रीवोल्युशन एक्स्पो" संपन्न

डी वाय पाटील अभियांत्रिकीच्या महाविद्यालयात "ऑटो रीवोल्युशन एक्सपो”  उत्साहात संपन्न झाले. मेकॅनिकल विभागातर्फे आयोजित या प्रदर्शनात  बैलगाडीच्या चाकापासून ते अद्ययावत दुचाकी वाहनांपर्यंतचा प्रवास उलगडून दाखवण्यात आला.

डी वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए.के गुप्ता यांनी या प्रदर्शनाचे उद्घाटन केले.  प्रदर्शनामध्ये १९४६ ए.जे.एस. ,लॅबंरेटा स्कूटर, लुना या जुन्या वाहनांपासून ते २०२५ बजाज फ्रीडम व आयक्यूब इत्यादी अद्ययावत वाहनांपर्यंत सर्व वाहने प्रदर्शित करण्यात आली होती. विंटेज गाड्यांपासून अद्ययावत गाड्यांचे दशकानुसार प्रदर्शन भरवण्यात आले होते. 

नवीन पिढीसाठी विंटेज गाड्यांची व जुन्या पिढीसाठी अद्ययावत गाड्यांची माहिती देणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश होता. प्रदर्शनात प्रत्येक वाहनाची सविस्तर माहिती प्रदर्शित करण्यात आली होती. त्यामुळे वाहन शौकीनांसाठी हि पर्वणीच ठरली. अनेक सुपर बाईक्स, यामाहा आर.एक्स १०० व रॉयल एनफिल्ड बुलेट ह्या दुचाकींची वैशिष्ट्यपूर्ण दशका नुसार मांडणी हेही या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य होते.

 मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ. सुनील रायकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. दिपक सावंत यांनी मेकॅनिकल अभियांत्रिकी विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने या प्रदर्शनाचे नीटनेटके आयोजन केले होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.


डी वाय पाटील अभियांत्रीकीमध्ये "ऑटो रीवोल्युशन एक्स्पो" संपन्न
Total Views: 42