बातम्या
कोल्हापूरातील ऑटो रिक्षांच्या भाडे दरात वाढ...
By nisha patil - 2/27/2025 6:22:25 PM
Share This News:
कोल्हापूरातील ऑटो रिक्षांच्या भाडे दरात वाढ...
भाडे दरात वाढ १ मार्च पासुन होणार लागु...
कोल्हापूर व इचलकरंजी ऑटो रिक्षासाठी रात्री १२ ते सकाळी ५ या कालावधीसाठी किमान भाडेदारांच्या 25% जास्त भाडे दर राहणार. १ मार्च 2025 पासून मीटर पुन: प्रमाणिकरण करून घेतील त्याच ऑटो रिक्षा धारकांसाठी भाडे सुधारणा लागू राहील अशी माहिती प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय भोर यांनी दिली.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरण कोल्हापूर व इचलकरंजी यांची संयुक्त बैठक दिनांक 25 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षते खाली व पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. यावेळी विविध रिक्षा संघटनांनी वाढलेल्या इंधनदाराच्या पार्श्वभूमीवर भाडेवाडीची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर तसेच समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने भाडे सुधारणेबाबत विविध रिक्षा संघटनांना वेळोवेळी अवगत करण्यात आले होते व याबाबत त्यांच्या शिफारसी भाडे सुधारणा करताना विचारात घेण्यात आल्यात.
कोल्हापूरातील ऑटो रिक्षांच्या भाडे दरात वाढ...
|