बातम्या
कार्यकर्त्यांच्या मेहनतीने काँग्रेस मुक्त कोल्हापूर करण्यात भाजपला यश......
By nisha patil - 11/26/2024 10:53:51 PM
Share This News:
कार्यकर्त्यांच्या मेहनतीने काँग्रेस मुक्त कोल्हापूर करण्यात भाजपला यश......
जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांचे प्रतिपादन .
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्षांचे व कार्यकर्त्यांचे केले अभिनंदन
कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व च्या सर्व जागा जिंकण्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा आहे .त्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस भुईसपाट झाली .भाजप मुक्त कोल्हापूर जिल्हा करणार अशी कोल्हेकुई करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना ही मोठी चपराक आहे .कोल्हापूर जिल्हा काँग्रेस मुक्त झाला . कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर, त्यांच्या पाठबळावर ,आणि त्यांनी केलेल्या अपार कष्टावर महायुतीचे सर्वच उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी झालेले आहेत . त्यामुळे भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडेच असून भविष्यकाळातील नगरपालिका जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणूक सामोरे जाण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच तयारी करावी . असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केले .भारतीय जनता पार्टीच्या कोल्हापूर जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष यांच्या बैठकीत ते बोलत होते .
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल मुंबई येथे सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक घेतली व सर्व जिल्हाध्यक्षांचे अभिनंदन केले . व भविष्यकालीन निवडणुकांविषयी व पक्षविस्ताराच्या योजनांविषयी मार्गदर्शन केले . त्याच अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपच्या तालुकाध्यक्षांची बैठक आज कोल्हापूर जिल्हा कार्यालयामध्ये पार पडली .
यावेळी पुढे बोलताना नाथाजी पाटील म्हणाले भाजपचा तळागाळातील कार्यकर्ता हा नेहमीच निष्ठेने काम करतो .पक्ष संघटन आणि पक्षाचा आदेश प्रमाण म्हणून हा कार्यकर्ता काम करत असल्याने पक्षाला सातत्याने यश मिळते याही वेळी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी भाजपच्या उमेदवारांबरोबरच महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली .आणि त्याचाच परिपाक म्हणून महायुतीचे संपूर्ण उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी झाले .हे यश सर्व कार्यकर्त्यांना समर्पित करावे लागेल .
यावेळी भाजपच्या तालुकाध्यक्षांनी या निवडणुकीत आपणाला आलेले अनुभव या बैठकीत विशद केले .सर्व कार्यकर्त्यांच्या संघटित शक्तीमुळे हा विजय सुकर झाल्याचे अनेकांनी नमूद केले .
यावेळी जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा सौ .सुशीला पाटील श्री प्रमोद कांबळे महेश चौगुले डॉ .सुभाष जाधव राजेंद्र तराळे,संभाजी आरडे दत्ता मेडशिंगे (करवीर) विलास रणदिवे ( राधानगरी )नामदेव चौगुले (भुदरगड )एकनाथ पाटील (कागल ) प्रीतम कापसे ,संतोष तेली (गडहिंग्लज )अनिल शिवनगेकर (चंदगड)मंदार परितकर (पन्हाळा ) स्वप्निल शिंदे (गगनबावडा )अनिल पंढरे (दक्षिण कोल्हापूर ) आदी तालुकाध्यक्ष उपस्थित होते . प्रारंभीस्वागत व प्रास्ताविक सरचिटणीस डॉक्टर आनंद गुरव यांनी केले तर आभार प्रकाश पाटील यांनी मानले .
कार्यकर्त्यांच्या मेहनतीने काँग्रेस मुक्त कोल्हापूर करण्यात भाजपला यश......
|