बातम्या
शाहू महाराजांचा पुतळा बदलण्याचा निर्णय घेतल्याबद्दल भाजपाचा दसरा चौकात आनंदोत्सव
By nisha patil - 6/7/2024 5:32:45 PM
Share This News:
दिल्ली येथील महाराष्ट्र सदनातील राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा त्याच्या स्वरूपामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला. महाराजांच्या या पुतळ्याबद्दल समाजातील सर्व स्तरांमधून टीका होऊ लागली दिल्लीतील महाराष्ट्र सदना मधील हा पुतळा महाराजांच्या धिप्पाड व्यक्तीमत्वाला ठेच पोहोचवणार आहे, याविषयी भाजपा कोल्हापूरच्या वतीने दिल्ली येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा तत्काळ बदला असे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, चंद्रकांतदादा पाटील यांना सुद्धा याविषयी इमेल द्वारे निवेदन पाठवण्यात आले होते.
याच विषयाला अनुसरून चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये मउपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा दिल्ली येथील महाराष्ट्र सदनातील पुतळा महाराष्ट्र सरकार लवकरच बदलणार असल्याबाबत जाहीर केले. या निर्णयाबद्दल आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने दसरा चौक याठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये, राजू मोरे, विराज चिखलीकर, शैलेश पाटील, माधुरी नकाते, दिग्विजय कालेकर, अभिजित शिंदे, प्रकाश सरनाईक, राजू जाधव, रुपाराणी निकम, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
शाहू महाराजांचा पुतळा बदलण्याचा निर्णय घेतल्याबद्दल भाजपाचा दसरा चौकात आनंदोत्सव
|