बातम्या

बच्चू कडूंनी ऑफर दिली असली तरी......मनोज जरांगे

Bachu kadu ,Manoj jarange


By nisha patil - 7/29/2024 4:54:26 PM
Share This News:



राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या विषयावर राजकारण तापलेले असताना विरोधक सत्ताधारी आणि मनोज जरांगे यांची एकमेकांना टीका प्रत्युत्तरे सुरू आहेत. आता त्यांनी प्रकाश आंबेडकरांसह पंकजा मुंडेंवरही निशाणा साधलाय. प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या आरोपांवर माझा विश्वास बसत नाही. हे माझ्यासाठी शॉकिंग असल्याचा जरांगे म्हणालेत.

मला माझ्या समाजाची शक्ती वाढवायची आहे. ते माझं स्वप्न आहे. मराठा समाज मोठा होऊ नये हे अनेकांचे स्वप्न आहे त्यामुळे बच्चू कडूंनी ऑफर दिली असली तरी याबाबत 29 ऑगस्टला समाजाच्या बैठकीत निर्णय घेऊ असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आरोपावर माझा विश्वासच बसत नाही. हे रोप माझ्यासाठी शॉकिंग असल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे.

वंचित बहुजनचे प्रमुख  प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण प्रश्नावर नुकताच जरांगे पाटील यांच्यावर आरोप केला होता. सगे सोयरेच्या मागणीला विरोध करत मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे अशी टीका त्यांनी केली होती. देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे यांचे भांडण नकली असल्याचा आरोप त्यांनी केला होता


बच्चू कडूंनी ऑफर दिली असली तरी......मनोज जरांगे