बातम्या
मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज भरावा
By nisha patil - 4/7/2024 7:53:48 PM
Share This News:
सन 2024-25 या चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत प्रवेशित असणाऱ्या तसेच पदविका अभ्यासक्रम पूर्ण करुन पदवीकरिता व्यावसायिक अभ्यासक्रम प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी bartievaldity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विहीत नमुन्यातील ऑनलाईन अर्ज भरावा, असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य उमेश घुले यांनी केले आहे.
तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET), (JEE), (NEET). (GATE), (NATA) ज्या अर्जदारांनी समितीकडे अर्ज सादर केलेले आहे व ज्यांना त्रुटी बाबत ई-मेलद्वारे किंवा पत्राद्वारे कळविण्यात आले आहे अशा अर्जदारांनी समिती कार्यालयात सर्व मुळ कागदपत्रांसह, मानीव दिनांकाच्या पुराव्यांसह उपस्थित राहण्याचे आवाहनही श्री. घुले यांनी केले आहे.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज भरावा
|