बातम्या

बहिरेश्वर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप

Bahireshwar


By nisha patil - 12/23/2024 8:14:37 PM
Share This News:



बहिरेश्वर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप

कोल्हापूर: श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व भूगोल विभागाच्या वतीने कै. श्रीपतराव शंकरराव बोंद्रे (दादा) व कै. विजयराव श्रीपतराव बोंद्रे (बापू )यांच्या जयंती महोत्सवानिमित्त विद्यामंदिर बहिरेश्वर येथील तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.के.शानेदिवाण, सरपंच सौ. वंदना निवृत्ती दिंडे पाटील, उपसरपंच रंगराव बापू कामत, मुख्याध्यापक गंगाराम भागोजी बाजारी, एन एस एस विभाग प्रमुख डॉ. डी.एल.काशीद पाटील,आय क्यू ए सी समन्वयक डॉ. आर. डी. मांडणीकर यांच्या हस्ते हे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी हे शैक्षणिक साहित्य घेतले.
 

स्वागत मुख्याध्यापक गंगाराम भागोजी बाजारी यांनी केले. प्रास्ताविक डॉ. डी. एल. काशीद पाटील यांनी केले.
 

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण म्हणाले, लहान वयातच विद्यार्थ्यांच्या मध्ये संस्काराची बीजे रुजली पाहिजेत. या शैक्षणिक साहित्यातून त्यांची प्रगती होईल आणि त्यातूनच हे विद्यार्थी परत समाजाला  सेवा वस्तू देऊन सामाजिक बांधिलकी जपतील. शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष गणेश बचाटे  यांनी मनोगत व्यक्त केले.सेवानिवृत्त मुख्याध्यापक पंढरीनाथ काशीद पाटील यांनी  आभार मानले. डॉ. डॉ एस डी जाधव, डॉ के एम देसाई, डॉ.ए.बी.बलुगडे,ग्रामस्थ, ग्रामपंचायतचे व इतर संस्थांचे पदाधिकारी, माजी विद्यार्थी उपस्थित होते.
   

श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे यांचे या उपक्रमास प्रोत्साहन मिळाले


बहिरेश्वर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप
Total Views: 37