विशेष बातम्या

शिवसेनाप्रमुखांच्या विचारानुसारच बाळासाहेबांच्या शिवसेनेची वाटचाल : जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण

Balasahebs Shiv Sena

By nisha patil - 1/23/2025 5:47:18 PM
Share This News:

शिवसेनाप्रमुखांच्या विचारानुसारच बाळासाहेबांच्या शिवसेनेची वाटचाल : जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण

कोल्हापूर दि. २३ : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अभिवादन करण्यात आले. जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी त्यांनी सांगितले की, "बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या विचारांच्या शिदोरीसह शिवसेनेची वाटचाल सुरु आहे." महानगरप्रमुख शिवाजी जाधव, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, तुकाराम साळोखे आणि अन्य शिवसैनिक उपस्थित होते.

शिवसेनाप्रमुखांच्या विचारानुसारच बाळासाहेबांच्या शिवसेनेची वाटचाल : जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण
Total Views: 133