बातम्या

मका खाण्याचे फायदे

Benefits of eating corn


By nisha patil - 9/10/2024 6:11:16 AM
Share This News:



मक्यामुळे शरीरातील अतिरिक्त फॅट्स कमी होतात. मक्यात असलेल्या बायोफ्लेवोनॉयड्स, कॅरोटेनॉयइस, विटॉमिन्स आणि फायबर्स असतात. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी मका फायदेशीर ठरतो.

हाडे बळकट होतात

मक्यात मॅग्नेशियम आणि आर्यन असते. त्यामुळे हाडांना बळकटी येते. याव्यतिरिक्त मक्यात झिंक आणि फॉस्फरस असते. त्यामुळे हाडासंबंधित रोग दूर होण्यास मदत होते. आर्थराइटिस आणि ऑस्टियोपोरोसिस यापासून संरक्षण होते.

शरीराला ऊर्जा मिळते
मक्यात कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. जर तुम्हाला दमल्यासारखे वाटत असेल तर किंवा काम करताना आळस येत असेल तर आहारात मक्याचा समावेश करा. त्यामुळे पोट लवकर भरते आणि उत्साह टिकून राहतो.

दृष्टी सुधारते

मका तुमच्या डोळ्यांसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. कारण त्यात व्हिटॉमिन ए आणि बीटा कॅरेटीन असते. त्यामुळे तुमची दृष्टी सुधारते. 

पोटाच्या समस्यांना आळा बसतो
अॅसिडीटी, बद्धकोष्ठता यांसारख्या पोटाच्या समस्या दूर होण्यास फायदा होतो. मक्यात फायबर असते त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. 

मक्यामध्ये मॅग्नेशियम आणि आर्यन मोठ्या प्रमाणात आढळते. यामुळे आपली हाडे मजबूत होण्यास मदत मिळते. मक्यामध्ये झिंक आणि फॉस्फरस हेही असल्यामुळे हाडासंबंधित रोग दूर होण्यास मदत होते.

मक्याच्या कणसामध्ये ल्यूटिन असते जे मोतीबिंदूच्या समस्येस प्रतिबंध करते. याशिवाय दररोज मक्याचे कणीस खाल्ल्याने तुमच्या डोळ्यांची नजर चांगली होते.

अनेक लोक नेहमीच आजारी पडतात कारण त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते. अशांनी आपल्या आहारात मक्याचे कणीस घ्यावे कारण त्यामध्ये लोह, व्हिटॅमिन ए, थायमिन, व्हिटॅमिन बी 6, जस्त, मॅग्नेशियम यासारखे पोषक घटक असतात जे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करतात.
एक कप उकडलेले मक्याच्या दाणे घ्या. टोमॅटो (बारीक चिरलेला), एक छोटा कांदा (बारीक चिरलेला), एक चमचा लोणी एक चमचा लिंबाचा रस, मीठ आणि चवीनुसार मिरपूड घाला. चविष्ट तर लागेल आणी आयर्न चा कमीपणा दूर होईल.

 


मका खाण्याचे फायदे