आरोग्य

पेरूची पाने खाण्याचे फायदे

Benefits of eating guava leaves


By nisha patil - 1/16/2025 7:22:57 AM
Share This News:



🔸बद्धकोष्ठता लगेच होईल दूर : पेरूच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं जे बद्धकोष्ठतेची समस्या सहजपणे दूर करतं. याने पचनास मदत मिळते आणि सकाळी पोट लवकर साफ होतं. पेरूच्या पानांमुळे रक्तात ग्लूकोजची लेव्हल वाढणंही रोखलं जातं.

🔸इम्यूनिटी वाढते : पेरूच्या पानांच्या सेवनाने जेवण केल्यावर ब्लड शुगर लेव्हल वाढत नाही. पेरूच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात अ‍ॅंटी ऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिन्स सी असतात. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. अशात शरीराचा अनेक आजार आणि इन्फेक्शनपासून बचाव होतो.

🔸डोळ्यांसाठी फायदेशीर : पेरूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं. जे डोळ्यांसाठी खूप गरजेचं आहे. नियमितपणे रिकाम्या पोटी पेरूच्या पानांचं सेवन केल्याने डोळ्यांची दृष्टी चांगली होते. पेरूच्या पानांमध्ये तणाव दूर करणारे गुण असतात आणि मानसिक आरोग्यही चांगलं राहतं.

🎯पेरूच्या पानांचे इतर फायदे
◆पेरूच्या पानांमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट, व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम आणि फायबर भरपूर असतात. या तत्वांमुळे तुमचं हृदय, पचन आणि शरीरक्रिया योग्य राहतात. 
◆पेरूच्या पानांचा चहा सेवन केल्यावर जेवल्यावर वाढलेली ब्लड शुगर लेव्हल कमी होते. अशात डायबिटीसच्या रूग्णांनी या पानांचं किंवा याच्या चहाचं सेवन केलं पाहिजे.
◆पेरूच्या पानांमधील अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिन हृदयाचा फ्री रॅडिकलपासून बचाव करतात. त्याशिवाय या पानांचा अर्क लो ब्लड प्रेशर, बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतो आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढवतो.
◆पेरूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी असतं. याने इम्यून सिस्टीम मजबूत होण्यास मदत मिळते. ज्यामुळे तुमचा वेगवेगळ्या आजारांपासून आणि इन्फेक्शनपासून बचाव होतो.


पेरूची पाने खाण्याचे फायदे
Total Views: 126