पदार्थ

दिवाळीत बनावट मिठाईपासून सावध रहा.....

Beware of fake sweets this Diwali


By nisha patil - 10/31/2024 6:27:35 AM
Share This News:



देशभरात दिवाळीचा उत्सव सुरू झाला आहे. या निमित्ताने पूजेबरोबरच घर सजवण्याची आणि एकमेकांचे तोंड गोड करण्याची प्रथा खूप जुनी आहे.

दिवाळीचे आगमन होताच बाजारपेठेत मिठाईची दुकाने सजतात. मात्र अशा परिस्थितीत बनावट आणि भेसळयुक्त मिठाईही मुबलक प्रमाणात विकली जाऊ लागली आहे. भेसळयुक्त मिठाईमुळे शरीरासाठी घातक आहे.

सण उत्सव प्रसंगी जेव्हा मिठाईची मागणी वाढते तेव्हा बनावट मिठाईचा वापर करून नफा मिळविण्यासाठी बनावट आणि रासायनिक रंगाच्या मिठाई बाजारात विकतात ज्यामुळे आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

बनावट मिठाई मिठाईचे दुष्परिणाम शरीराला कसे हानी पोहोचवू शकतात जाणून घ्या...
बनावट मिठाई बनवण्यासाठी फसवणूक करणारे खवा आणि दुधाऐवजी बटाटा, आयोडीन, डिटर्जंट, सिंथेटिक दूध, व्हाईटनर, खडू, युरिया आणि इतर प्रकारची रसायने वापरतात.

इतकंच नाही तर मिठाई सजवण्यासाठी सिल्व्हर वर्क ऐवजी अल्युमिनियम वर्कचा वापर केला जात आहे, जो आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतो.

मिठाईमध्ये रंगाच्या नावाखाली रसायन मिसळणे, बनावट मावा, नकली दूध, यांचा वापर केला जातो. आणि आपण जर अशा प्रकारची मिठाई खात असाल तर यामुळे अनेक आजार तुम्हाला होऊ शकतात.

बनावट मिठाईच्या सेवनामुळे मेंदूचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग, रक्ताचा कर्करोग, किडनीचे आजार, श्वसनाचे आजार आणि अनेक प्रकारच्या अलर्जी होऊ शकतात, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अनेक ठिकाणी मिठाईत भेसळ करताना त्यात स्टार्च आणि अनसॅच्युरेटेड फॅट सारख्या गोष्टी मिसळल्या जातात, ज्याचे सेवन केल्याने शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी खूप वाढते आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो

मिठाईवरील अल्युमिनिअमचे पोटात जाऊन मेंदू आणि हाडांना मोठी हानी पोहोचवते. याच्या सेवनाने मुलांच्या किडनीवर विपरीत परिणाम होत असल्याचे सांगितले जाते.


दिवाळीत बनावट मिठाईपासून सावध रहा.....