बातम्या
"भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत" स्पर्धेला आ.विनय कोरेंची भेट
By nisha patil - 1/30/2025 7:40:37 PM
Share This News:
"भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत" स्पर्धेला आ.विनय कोरेंची भेट
बैल आणि शेतकरी यांचे जीवाभावाचे नाते : आ. डॉ.विनय कोरे
सावर्डे येथे संयुक्त युवा तालीम यांनी आयोजित केलेल्या "भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत" स्पर्धेला आ. डॉ.विनय कोरेंची भेट देऊन बैलगाडा शर्यत स्पर्धेचा थरार अनुभवला. आ. डॉ.विनय कोरे बोलताना म्हणाले, बैल आणि शेतकरी यांचे जीवाभावाचे नाते आहे.
राज्यातील बैलगाडी शर्यतीला प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. पारंपारिक वारसा व शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडी शर्यतीकडे पाहिले जाते. या भव्य स्पर्धेचे संयुक्त युवा तालीम यांनी केलेलं नेटके नियोजन कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी श्री तात्यासाहेब कोरे सहकारी दूध-साखर वाहतूक संस्थेचे संचालक एच.आर.पाटील,आबासो पाटील,पोलीस पाटील सागर यादव यांच्यासह संयुक्त युवा तालीमीचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच बैलगाडा मालक व शर्यत शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते..
"भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत" स्पर्धेला आ.विनय कोरेंची भेट
|