बातम्या
सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या गैरकारभाविरोधात भोई समाजाचे उपोषण...
By nisha patil - 6/25/2024 7:55:50 PM
Share This News:
सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कोल्हापूर यांच्या गैरकारभाविरोध भोई समाजाचे उपोषण सुरू असून 1982 चे बनावट पत्र तयार करून हणबरवाडी तलाव काढून घेण्याचा घाट सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कोल्हापूर यांनी केला असून त्याच्या निषेधार्थ भोई समाजाच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले आहे.यावेळी या आंदोलनाला आ .जयश्री जाधव यांनी भोई समाजाच्या या आंदोलनाला उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला. तर ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी भोई समाजाला पाठिंबा देत एकजुटीने न्याय मिळवण्याचा सल्ला दिला. यावेळी ठाकरे गटाचे संजय पवार, आमदार जयश्री जाधव, जिल्हाध्यक्ष विजय देवने यांनी संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन प्रश्नाचे निरसन करण्याचे आदेश दिले याशिवाय पाच वाजेपर्यंत शिफारस पत्र देण्याची ही विनंती केली जर पाच वाजेपर्यंत पत्र नाही मिळाले तर यावेळी भोई समाजाच्या वतीने आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी अध्यक्ष नामदेव ती कोण, सेक्रेटरी धोंडीराम कांबळे संचालक राजेंद्र ठोंबरे सोपान कनोजे जी वि भोई सुनील काटकर राजेंद्र नलावडे सुभाष आयरे अरुण नलवडे याशिवाय भोई समाज बागडी समाज कोळी समाजाचे बांधव उपस्थित होते
सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या गैरकारभाविरोधात भोई समाजाचे उपोषण...
|