शैक्षणिक
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थी विकास व संगणक सुविधा केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन
By nisha patil - 2/25/2025 4:56:17 PM
Share This News:
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थी विकास व संगणक सुविधा केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन
शिवाजी विद्यापीठास शासन स्तरावर सहकार्याची भूमिका राहील....
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थी विकास आणि संगणक सुविधा केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी शिवाजी विद्यापीठास शासन स्तरावर सहकार्याची भूमिका राहील. विद्यापीठाने सृजनात्मक व नवोन्मेषी स्वरूपाचे काम येथून पुढील काळात अधिक गतीने करावे, अशी अपेक्षा ना. प्रकाश आबिटकरांनी व्यक्त केली.
या प्रसंगी बोलताना ना. प्रकाश आबिटकर म्हणाले की, मी स्वतः शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी असल्यामुळे विद्यापीठाने केलेल्या वाटचालीचा मला अभिमान आहे. आपण सर्वांनी मिळून या विद्यापीठाचे भवितव्य अधिक उज्ज्वल होण्यासाठी प्रयत्न करू या असे आवाहन केले. यावेळी कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के, प्र-कुलगुरू डॉ.पी.एस.पाटील, कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे, इनोव्हेशन, इनक्यूबेशन व लिंकेजेस केंद्राचे संचालक डॉ.सागर डेळेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थी विकास व संगणक सुविधा केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन
|