बातम्या

अजित पवार गटाला मोठा धक्का...

Big blow to Ajit Pawar group


By nisha patil - 7/17/2024 2:55:39 PM
Share This News:



राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. बालेकिल्ला मानला जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड मध्ये राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे. ४ पदाधिकाऱ्यांसह एकूण २४ जणांनी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.शरद पवारांच्या उपस्थितीत या २४ जणांनी तुतारी हाती घेतली आहे.अजित गव्हाणे यांचा समर्थकांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आज प्रवेश झाला आहे. पुण्यातील मोदी बागेत शरद पवार यांच्या उपस्थितीत या सर्वांनी प्रवेश केला आहे.


अजित पवार गटाला मोठा धक्का...