राजकीय
मंत्री धनंजय मुंडेंना मोठा धक्का...
By Administrator - 1/15/2025 4:12:09 PM
Share This News:
बीड: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्याने मंत्री धनंजय मुंडे यांना पक्षाने मोठा धक्का दिल्याचे सांगितले जात आहे. मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा निर्णय जाहीर केला.
बैठकीत बीड जिल्ह्याचे पक्षाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, माजी आमदार संजय दौंड आणि अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या निर्णयामुळे जिल्ह्यात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे धनंजय मुंडे यांच्या राजकीय भविष्यासाठी नवीन आव्हाने उभी राहिली आहेत.
मंत्री धनंजय मुंडेंना मोठा धक्का...
|