बातम्या
बायोगॅसचा डंका दिल्लीमध्ये: महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव
By nisha patil - 1/26/2025 6:56:07 PM
Share This News:
बायोगॅसचा डंका दिल्लीमध्ये: महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव
केंद्र शासनाच्या नवीन ऊर्जा मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रमात देशभरातील पाच उत्कृष्ट शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. या शेतकऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील दोन शेतकरी, नांदेड जिल्ह्यातील रामचंद्र भोजने आणि रत्नाकर ढगे यांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनी सायंकाळी चार वाजता दिल्ली येथे इन होम रिसेप्शन कार्यक्रमात या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधित्व कृषी विभागाचे विस्तार अधिकारी मोहनदास दाभाडे यांनी नोडल अधिकारी म्हणून केले. त्यांच्या कौशल्यपूर्ण समन्वयामुळे महाराष्ट्राला राष्ट्रीय पातळीवर मोठा सन्मान मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य देशातील बायोगॅस उत्पादन आणि व्यवस्थापनामध्ये आघाडीवर असून, कोल्हापूर जिल्हा यामध्ये विशेष योगदान देत आहे. या कामगिरीमुळे राज्याचा देशपातळीवरचा सन्मान वाढला आहे. मोहनदास दाभाडे यांचे या उपक्रमातील नेतृत्व आणि योगदान अत्यंत प्रशंसनीय आहे.
बायोगॅसचा डंका दिल्लीमध्ये: महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव
|