शैक्षणिक
शिवाजी विद्यापीठात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती
By nisha patil - 1/23/2025 10:08:19 PM
Share This News:
शिवाजी विद्यापीठात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती
कोल्हापूर, दि. 23 जानेवारी - नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज विद्यापीठात साजरी करण्यात आली.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज सकाळी कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ.विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ.सुहासिनी पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.अजितसिंह जाधव, डॉ.तानाजी चौगुले, डॉ.सागर डेळेकर, डॉ.रामचंद्र पवार, डॉ.शरद बनसोडे, उपकुलसचिव डॉ.प्रमोद पांडव, डॉ.के.वाय.राजपुरे, डॉ.अण्णासाहेब मोहोळकर, डॉ.मानसिंग टाकळे, डॉ.राजीव व्हटकर, डॉ.कविता ओझा, डॉ.उर्मिला पोळ यांचेसह शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवाजी विद्यापीठात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती
|