बातम्या
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा भोपळा
By nisha patil - 11/23/2024 11:55:34 PM
Share This News:
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा भोपळा,
महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..
खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्ह्यातील तमाम नागरिकांचे आभार व्यक्त केले आहेत. निवडणुकीपूर्वी बोलतानाच खासदार महाडिक यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या दहा जागा विजयी होतील असे सांगितले होते. दोन वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टीने राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवले आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांची जबाबदारी दिली. महाराष्ट्रातील जनतेने 2019 ते 24 या कालावधीत दोन्ही सरकार बघितली. पहिले अडीच वर्षे महाराष्ट्रात भ्रष्टाचारी आणि घोटाळेबाज सरकार सत्तेवर होते. उद्योगपतींना त्रास देणारे, मंत्री जेलमध्ये असणारे सरकार अशी त्यांची प्रतिमा झाली होती. या उलट महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची निर्मिती केली. अनेक लोककल्याणाच्या योजना आणल्या. महाराष्ट्राला देशात नंबर वन करण्याचे काम केले. लाडकी बहिण, लाडका भाऊ योजना, शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ अशा योजनांमुळे महायुतीचे सरकार लोकप्रिय झाले. आणि म्हणूनच महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा महायुतीला सत्ता दिली आहे. निवडणूक काळात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विकासाबद्दल चकार शब्दही काढला नाही. केवळ टीकात्मक भाषणे झाली. याउलट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह महायुतीच्या सर्व नेत्यांनी विकासाच्या योजना मांडल्या. योगीजींची कोल्हापूर मध्ये सभा झाली. त्यामध्ये बटोगे तो कटोगे, हा त्यांनी नारा दिला. त्याचाही या निवडणुकीत महायुतीला फायदा झाला. माजी पलक मंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा महाडिक मुक्त करू, कोल्हापूर जिल्हा कमळ मुक्त - भाजप मुक्त करू , अशा वल्गना केल्या होत्या. पण आज त्यांच्या वर्तणुकीमुळे कोल्हापूर जिल्हा काँग्रेस मुक्त झाला आहे. त्यांची मग्रुरी, दादागिरी, दहशतीची भाषा कोल्हापूरकरांना आवडली नाही. तसेच छत्रपती घराण्याच्या स्नुषा मधुरिमा राजें यांचा अवमान केला. हा प्रकार कोल्हापूरकरांना रुचला नाही आणि त्यामुळे कोल्हापूरकरांच्या मनातील प्रचंड चीड, या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव करण्यास कारणीभूत ठरली. सतेज पाटील यांचे राजकारण नेहमी घातकी आणि स्वार्थी आहे. आपणच आता मुख्यमंत्री होणार, या अविर्भावात ते फिरत होते. त्याचा कोल्हापूरच्या जनतेने या निवडणुकीत वचपा काढून, त्यांची जागा दाखवून दिली आहे. अमल महाडिक यांचे पाच वर्षातील विकासात्मक काम जनतेने पाहिले होते. एक नम्र आणि कृतीवर भर देणारा युवक म्हणून, कोल्हापूरची जनता त्यांच्याकडे पाहत आहे. तर ऋतुराज पाटील यांना स्वतःच्या काकांची अनुमती घेतल्याशिवाय कोणतेही काम करता आले नाही. मुळात ऋतुराज पाटील यांना विकासाची दृष्टी नव्हती. जनसंपर्क नव्हता. त्यामुळेच ऋतुराज पाटलांचा दक्षिणच्या जनतेने पराभव केलेला आहे. त्यातून सतेज पाटील यांनाही कोल्हापूरकरांनी धडा शिकवला आहे.
यापुढे जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व आमदारांमध्ये विकासाची दृष्टी असेल. जिल्ह्यातील महायुतीचे सर्व आमदार विकासाचे धोरण राबवतील आणि सर्वांगीण प्रगतीच्या योजना यशस्वी करतील.आगामी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेच्या निवडणुका महायुती एकसंघपणाने लढेल आणि विजय संपादन करेल.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा भोपळा
|