बातम्या

प्रजासत्ताक दिनानिमित्त दोस्ती सर्कलचे रक्तदान शिबिर...

Blood Donation Camp


By nisha patil - 1/27/2025 1:52:11 PM
Share This News:



प्रजासत्ताक दिनानिमित्त दोस्ती सर्कलचे रक्तदान शिबिर...

स्वप्निलदादा आवाडेंच्या हस्ते शुभेच्छा

पाचव्या वर्षीही दोस्ती सर्कलचे रक्तदान शिबिर यशस्वी

 रक्तदान... हेच श्रेष्ठ दान! या संकल्पनेला पुढे नेत, प्रजासत्ताक दिनानिमित्त गेले पाच वर्षे इचलकरंजी येथील दोस्ती सर्कलच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. यंदा हे शिबिर शहापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडले.

या शिबिराला क. आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे यांनी भेट देऊन दोस्ती सर्कलच्या सदस्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी माजी नगरसेवक मनोज साळुंखे, रणजित अनुसे, राजू कबाडे, सुरेश चव्हाण, सचिन कांबळे, अक्षय चव्हाण, रणजित पाटील, ऋषिकेश मिठारी, स्वप्निल लोहार, अमर कदम, प्रथमेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या शिबिराचे आयोजन अत्यंत यशस्वी ठरले. या निमित्ताने समाजसेवेच्या भावनेने प्रेरित दोस्ती सर्कलने पुन्हा एकदा रक्तदानाच्या महत्त्वावर भर दिला.


प्रजासत्ताक दिनानिमित्त दोस्ती सर्कलचे रक्तदान शिबिर...
Total Views: 30