बातम्या

दि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन संचालक मंडळाची बोर्ड मीटिंग संपन्न...

Board Meeting of The Maharashtra Co operative Bank Federation Board of Directors concluded


By nisha patil - 7/22/2024 12:04:49 PM
Share This News:



 दि महाराष्ट्र को-ऑप बँक्स फेडरेशन, मुंबईच्या संचालक मंडळाची बोर्ड मिटिंग कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारती मध्ये पार पडली. यावेळी बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे यांनी सर्व संचालकांचे स्वागत केले. तसेच बँकेची सर्व माहिती दिली व सर्व संचालकांचा यथोच्छित सत्कार केला. यावेळी फेडरेशनचे अध्यक्ष अजयजी ब्रम्हेचा, उपाध्यक्षा वैशालीताई आवाडे, संचालक मिलिंद काळे, रत्नाकर कदम, मिलिंद आरोलकर, विजय ढेरे, सुनिल देवडा, सत्यनारायण लोहिया, नानासाहेब सोनवणे, डॉ. शशीताई अहिरे, चंद्रहास गुजराथी, अशोक शेळके, निपुण कोरे, योगेश्वर बन, अनिल देसाई, राजगोपाल मिणीयार, दत्ताराम चाळके, सतीश गुप्ता, फेडरेशनच्या सी ई ओ सौ. सायली भोईर, क आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेचे व्हा चेअरमन संजयकुमार आनिगोळ, व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत चौगुले, बँकेचे सी ई ओ संजय शिरगावे, जनरल मॅनेजर किरण पाटील यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.


दि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन संचालक मंडळाची बोर्ड मीटिंग संपन्न...