बातम्या
कागल येथील बोगस मतदानाची तपासणी करावी : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांची तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.
By nisha patil - 10/25/2024 9:31:54 PM
Share This News:
कागल /प्रतिनिधी कागल विधानसभा मतदारसंघात 273 मधील कागल शहरामध्ये सुमारे 500 हून अधिक नवीन नावे ऑनलाईन ट्रान्सफर ॲप.फॉर्म नंबर आठ द्वारे नोंदलेली आहेत. ही चुकीची आहेत असे आमच्या खात्रीपूर्वक निदर्शनास आले आहे . या नावांची रीतसर शहानिशा बी.एल.ओ.मार्फत करावी. जर अयोग्य असतील तर त्यास स्तागिती द्यावी अशी मागणी तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हंटले आहे, आपल्याकडे जी नावे आलेली आहेत ती दुसऱ्या जिल्ह्यातून आलेले आहेत.वास्तविक नवीन आलेल्या नावांची यादी सात दिवसांच्या आत प्रसिद्ध व्हावयास हवी होती.मात्र अद्यापही ती यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.ही नावे चुकीच्या पध्दतीने नोंदणीसाठी आलेली असतील तर त्यास स्थगिती द्यावी. या संशयास्पद नावांबाबत आपल्याकडून एकतर्फी कारवाई होऊ नये. अशी मागणी त्यांनी केली आहे. एक-दोन नावाची शहानिशा आम्ही केली असून ती पर जिल्ह्यातील आहेत हे निदर्शनास आले आहे
त्यामुळेयाबाबत योग्य न्याय न मिळालेस निवडणूक आयोगाकडे आम्ही दाद मागणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. निवेदनावर रमीज रशीद मुजावर, एम पी पाटील, युवराज पाटील, नंदकुमार माळकर, गजानन माने प्रा. सुनील मगदूम सतीश पाटील,मारुती पांडुरंग पाटील,धीरज मोहन घाटगे, उमेश सावंत, आप्पा हूच्चे,अरुण अशोक गुरव,प्रकाश रामगोंडा पाटील,राजेंद्र भिमराव जाधव,सुशांत सुभाष कालेकर, सचिन आबासाहेब मोकाशी,सचिन राजाराम निबाळकर यांच्या सह्या आहेत.
कागल येथील बोगस मतदानाची तपासणी करावी : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांची तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.
|