बातम्या

कागल तालुक्यातील कौलगे येथे तरुणाचा निर्घृण खून; मृतदेह सामाजिक वनीकरणात आढळला

Brutal murder of youth at Kaulge in Kagal taluka

By nisha patil - 1/17/2025 5:44:31 PM
Share This News:

कागल तालुक्यातील कौलगे येथे तरुणाचा निर्घृण खून; मृतदेह सामाजिक वनीकरणात आढळला

कागल तालुक्यातील कौलगे येथे स्वप्नील उर्फ पांडुरंग अशोक पाटील (वय ३०) या तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आज (दि.१७) त्याचा मृतदेह गावानजीकच्या खडकेवाडा हद्दीतील सामाजिक वनीकरण क्षेत्रात आढळून आला.

प्राथमिक तपासानुसार, डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे समजते. मृतदेहाच्या जवळ रक्ताने माखलेला दगड आढळून आला असून मृतदेह जाळण्याचा प्रयत्नही झाल्याचा संशय आहे. दोन दिवसांपासून गायब असलेल्या स्वप्नील पाटीलचा मृतदेह अत्यंत निर्जन भागात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी मुरगूड पोलीस दाखल झाले असून तपास सुरू आहे.

कागल तालुक्यातील कौलगे येथे तरुणाचा निर्घृण खून; मृतदेह सामाजिक वनीकरणात आढळला
Total Views: 55