विशेष बातम्या
एक महिन्याच्या विलंबानंतर अंदाजपत्रक सादर होणार
By nisha patil - 3/24/2025 5:02:31 PM
Share This News:
एक महिन्याच्या विलंबानंतर अंदाजपत्रक सादर होणार
उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीमुळे अंदाजपत्रक सादरीकरण पुढे ढकलले
महानगरपालिकेचे 2024-25 सालचे सुधारित आणि 2025-26 सालचे नवीन अंदाजपत्रक बुधवारी प्रशासक के. मंजूलक्ष्मी सादर करणार आहेत. महसुली वसुलीत अपयश आल्याने प्रशासन आर्थिकदृष्ट्या अडचणीत असल्याचे स्पष्ट झालंय.
सामान्यतः फेब्रुवारीत अंदाजपत्रक तयार होऊन मार्चच्या पहिल्या आठवड्यात स्थायी समितीला सादर केले जाते. मात्र, लोकनियुक्त महासभा नसल्याने गेल्या पाच वर्षांपासून प्रशासक हे काम करत आहेत.
यंदा अंदाजपत्रक सादरीकरणास महिन्याभराचा उशीर झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हद्दवाडी संदर्भातील मुंबईतील बैठकीमुळे सोमवारी प्रस्तावित अंदाजपत्रक सादरीकरण पुढे ढकलले गेले असून आता ते बुधवारी दुपारी सादर केले जाणार आहे.
एक महिन्याच्या विलंबानंतर अंदाजपत्रक सादर होणार
|