बातम्या
राजारामपुरी येथे घरफोडीतील चोरट्यास अटक.
By nisha patil - 6/2/2025 7:19:47 PM
Share This News:
पाचगाव येथील प्रसाद मारुती शिंदे यांच्या राजारामपुरी येथील बंद दुकानातुन चोरट्यांने 40 हजार रुपयांची रोकड आणि शिल्पजा प्रमोद कनगुटकर यांच्या राजारामपुरी 5 व्या गल्लीतील मानसिंग रेसिडेंन्सीमधील 6 व्या मजल्यावर बंद असलेल्या घरातुन 1 लाख 40 हजार रुपये रोख असा एकूण एक लाख 70 हजार रुपये चोरी केल्या प्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या शोध पथकाने चोरट्यास अटक केलीय.यश दिपक बरगे या राजारामपुरीतीलच घरफोड्याने ही चोरी केल्याचं निष्पन्न झालंय.आज पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
राजारामपुरी येथे घरफोडीतील चोरट्यास अटक.
|