बातम्या
पायांच्या तळव्यांची आग होणे.
By nisha patil - 12/10/2024 5:50:21 AM
Share This News:
कारणे,
शरीरात उष्णता वाढणे, आम्लपित्त वाढणे, पचनशक्ती कमजोर होणे, मांसाहार करणे, पोट साफ नसणे. जाग्रण करणे. इ.
वरील सर्व कारणे कमी करा.
उपाय,
१) रात्री झोपतेवेळी पायांच्या तळव्यांना तुप / खोबरेल तेल लावणे. नंतर काश्याच्या वाटीने घासणे. तसेच नाभीत (बेंबीत) खोबरेल तेल घालणे. चांगला उपाय आहे.
२) नियमित प्राणायाम करा. सर्वच आजार नष्ट होतील.
३) रोज एक चमचा गुलकंद खाणे.
४) एक कप ताक + एक चमचा आवळापूड + थोडे मीठ मिक्स करून दोन वेळा पाच दिवस घेणे.
५) सकाळी एक / दोन ग्लास कोमट / गरम पाणी चहा प्रमाणे बशीतून पिणे.
६) आवळा पदार्थ / काळी मनुका खाणे. पित्त कमी होईल.
७) पोट साफ होण्यासाठी एक पेला दुध + एक चमचा देशी गाईचे तुप + थोडे गुळ किंवा साखर रात्री झोपण्यापूर्वी घेणे. किंवा त्रिफळा चूर्ण घेणे.
८) हालकाच आहार घेणे..
आजारांशी तडजोड करू नका, प्राणायामाची साथ सोडू नका.
पायांच्या तळव्यांची आग होणे.
|