बातम्या
कोल्हापूर कॅन्सर सेंटरतर्फे कॅन्सर जणजागरूकता रॅली संपन्न
By nisha patil - 5/2/2025 12:17:35 PM
Share This News:
कोल्हापूर कॅन्सर सेंटरतर्फे कॅन्सर जणजागरूकता रॅली संपन्न
आरोग्य शिबिर व व्याख्यानांच्या माध्यमातून जनजागृती
जागतिक कर्करोग दिनानिमित्त कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या वतीने कॅन्सरविषयी जनजागृती करण्यासाठी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. दसरा चौकातून सुरू झालेल्या या रॅलीत डॉक्टर, विद्यार्थी आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी तंबाखू सेवन टाळा, नियमित तपासणी करा अशा घोषणा देत नागरिकांमध्ये जनजागृती केली.
यावेळी डॉ. प्रसाद तानवडे यांनी “कर्करोग प्रतिबंधासाठी स्वतःपासून सुरुवात करणे गरजेचे आहे,” असे सांगितले. ही रॅली महापालिका, सीपीआर चौक मार्गे पुन्हा दसरा चौकात विसर्जित झाली. यात डॉ. रेश्मा पवार, डॉ. संदीप पाटील, डॉ. पराग वाटवे, डॉ. योगेश आनाप यांच्यासह डी. वाय. पाटील नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रॅलीनंतर मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले, जिथे डॉ. सुरज पवार यांनी वेळोवेळी तपासणीचे महत्त्व अधोरेखित केले. पुढील काही दिवस कॅन्सरविषयी विशेष व्याख्याने व कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
कोल्हापूर कॅन्सर सेंटरतर्फे कॅन्सर जणजागरूकता रॅली संपन्न
|